मुंबई : मुंबईमधील मालाड येथे आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडल्याच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आईस्क्रिममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा हा इंदापूरच्या फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आईस्क्रिमचं पॅकिंग करताना झालेल्या अपघातात संबंधित कर्मचाऱ्याच्या बोटाचा काही भाग तुटला होता. संबंधित कर्मचाऱ्याला उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग अपघातात गमवावा लागला होता. बोटाचा तुकडा […]