प्रतिनिधी, पुणे : ‘तुम्ही मुंबईहून तैवानला पाठविलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत,’ अशी भीती दाखवून पोलिस कारवाईच्या भीतीने नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या २२ घटनांमधून सायबर चोरट्यांनी साडेसात कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे.शहरात दर तीन दिवसांनी ‘कुरिअर फ्रॉड’ची एक घटना घडत आहे. सायबर हल्ले रोखण्याचे आव्हान ठाकलेल्या […]