प्रतिनिधी, पुणे : राज्य सरकारने कायदा करून, मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची केली. मात्र, राज्य अभ्यासक्रम आराखड्यात (शालेय शिक्षण) मराठी भाषेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शालेय़ शिक्षणाच्या इयत्तानिहाय गटांमध्ये विद्यार्थ्याने मराठी भाषेचे शिक्षण घ्यावे, अशी अनिवार्यता केलेली नाही. भाषा विषयांना केवळ क्रमांक देऊन, त्यांना पर्य़ाय म्हणून ठेवण्यात आल्याची टीका अभ्यासकांकडून केली जात आहे.’एमसीईआरटी’ने राज्य […]