प्रतिनिधी, पुणे : पुणे पोलिसांकडून वर्षाला सरासरी साडेतीनशे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शहरात ३६ लाखांहून अधिक वाहनसंख्या असून, शेकडो बार आणि पबमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण मद्यपान करतात आणि वाहने चालवतात. या प्रमाणात कारवाईची आकडेवारी पाहिल्यास केवळ दिखावा असल्याचेच स्पष्ट होते. गेल्या अडीच वर्षांत केवळ एक हजार ७८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली […]