प्रतिनिधी, पुणे : खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचा पुरावा म्हणून वापरण्यात येणारे १९८५ ते ८७ या तीन वर्षांतील जीर्ण झालेले दस्त; तसेच मालमत्तेची ‘इंडेक्स टू’ (सूची) या रेकॉर्डचे आता ‘डिजिटायझेशन’ करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या सहनिबंधक कार्यालयाने हा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. तीन वर्षांतील सुमारे ३० हजार दस्तांचे डिजिटायझेशन करण्यात येणार […]