प्रतिनिधी, पुणे : पावसाळ्यात महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित असला, तरी उपायुक्त दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध नसतो. त्यामुळे अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी समन्वयाचा अभाव दिसून येतो. या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्तांनी या कक्षासाठी सात उपायुक्तांना रात्रपाळी लागू केली आहे. या उपायुक्तांना आपत्ती व्यवस्थापन कक्षात बसून, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामकाजाचे नियंत्रण, व्यवस्थापन आणि समन्वयाची जबाबदारी […]