मुंबई : विधान परिषदेवरील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या प्रत्येकी दोन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. यानुसार, येत्या २६ जूनला मतदान होणार असून, एक जुलै रोजी निकाल जाहीर होईल. घोषणेनंतर काही तासातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून दोन उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवारही समोर […]