प्रतिनिधी, पुणे : ‘सायकलींचे शहर’ अशी ओळख असलेल्या पुण्यात रस्त्यांवर सायकल चालविणे, दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने सायकल चालविण्यासाठी तयार केलेले खास ट्रॅक नावापुरतेच राहिले आहेत. शहरात भरधाव वाहनांच्या गर्दीत सायकलस्वार भरडला जात आहेत.पुणे हे पूर्वी ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखले जात असे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर नागरिक सायकलीने प्रवास करताना दिसत असल्याचे ज्येष्ठ नागरिक […]