मुंबई : ‘नवी मुंबईतील घणसोली येथे दोन दशकांपूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी २० एकर जमीन राखीव केली असताना ते संकुलच रायगडमधील माणगाव तालुक्यातील नानोरे गावात हलवण्याचा निर्णय हा घटनाबाह्य व बेकायदाच नाही, तर भावी पिढ्यांच्या मूलभूत हक्कांचेही उल्लंघन करणारे आहे’, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा तो निर्णय रद्दबातल केला आहे. त्याचबरोबर […]