Posted inपुणे

विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका, ‘थ्री कोर्स मील’ची मेजवानी, शालेय पोषण आहारात १५ लज्जतदार पदार्थ

प्रतिनिधी, पुणे : राज्यातील शाळांमध्ये ‘पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण’ योजनेच्या अंतर्गत (पूर्वीचे शालेय पोषण आहार) येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना अंडा पुलाव, मसालेभात, मटार पुलाव, व्हेजिटबल पुलाव, तांदळाची खीर अशा पद्धतीचे ‘थ्री कोर्स मील’ देण्याचा निर्णय मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने घेतला. शिक्षण विभागाने नेमलेल्या पाककृती सुधारणा समितीने सुचवलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या माध्यमातून सरकारी आणि अनुदानित […]