मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद स्थानकांदरम्यान शहरातील दीडशे वर्षांहून अधिक जुना असलेला कर्नाक बंदर रेल्वे उड्डाणपूल पाडल्यानंतर आता त्याच्या पुनर्बांधणीला वेग आला आहे. कर्नाक पुलाचा पहिला गर्डर उभारण्याचे काम शनिवारी मध्यरात्रीनंतर करण्यात येणार आहे. विशेष पोर्टल बूमच्या उभारणीसाठी, ८०० मेट्रिक टन क्षमतेच्या एअरड्रॉप रोड क्रेनद्वारे जुने अँकर हटवण्यात येणार आहेत. या कामासाठी […]