प्रतिनिधी, पुणे : जंगलातील रात्रीची गूढ शांतता, अधूनमधून दृष्टिक्षेपास पडणारे वन्यप्राणी, त्यांच्या हालचाली, पाणवठ्यांवरील वातावरण अनुभण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेला ‘निसर्गानुभव’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा २३ मेच्या रात्री पुणे जिल्ह्यातील विविध अभयारण्यांमध्ये हा उपक्रम होणार असून, त्यात वन्यप्राणीप्रेमींनाही सहभागी होता येणार आहे. भीमाशंकर अभयारण्य, सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य (चिंकारा) आणि ताम्हिणी अभयारण्यात […]