मुंबई : माजी सहायक पोलिस आयुक्ताला लबाड व लाचखोर म्हणणे इस्टेट एजंटला भोवले असून त्याच्याविरोधात आता न्यायदंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला चालणार आहे. कारण मुंबई सत्र न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज फेटाळल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून लावली आहे. काय आहे प्रकरण?सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेले मधुकर थावळ यांनी नरेश राजवानी यांच्या विरोधात भादंविच्या कलम ५०० […]