प्रतिनिधी, पुणे : बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री झालेला अपघातालाही ‘मद्यपार्टी’च जबाबदार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अपघातग्रस्त भरधाव कारमध्ये चालकासह चौघे जण होते. ते धानोरी येथे पार्टी करून घरी जात असताना अपघात झाला. दरम्यान, कल्याणीनगर येथील पोर्शे अपघातही पार्टीनंतरच झाला होता. त्यामुळे पार्ट्यांमध्ये मद्यपान केल्यानंतर बेदरकारपणे वाहन चालविणे धोकादायक ठरत असल्याचेच पुन्हा एकदा अधोरेखित […]