मुंबई : घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या मुंबई महापालिकेने रखडलेल्या जाहिरात फलकांच्या नवीन धोरणाच्या आखणीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन धोरण येत्या ऑगस्टमध्ये येणार असून, मुंबईतील इमारतींवरील जाहिरात फलकांमुळे असलेला धोका लक्षात घेता, अशा फलकांवर बंदी घालण्याचा विचार महापालिका करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त अश्विनी […]