प्रतिनिधी,मुंबई : रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे श्रेष्ठ दान करण्यात पुणेकर अव्वल स्थानी आहेत, तर मुंबईकर दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. राज्यातील एकूण रक्तदानापैकी सुमारे ३२ टक्के रक्तदान पुणे आणि मुंबईत झाल्याचे मागील वर्षीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.सन २०२३मध्ये राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये ३३ हजार ८०७ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. […]