Posted inपुणे

Blood Shortage In Pune: पुण्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा; प्लेटलेट्सच्या मागणीतही वाढ, नातेवाइकांची धावपळ

प्रतिनिधी, पुणे : झिका, डेंगी, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणीदेखील वाढली आहे. परिणामी रक्त आणि प्लेटलेट्स मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत असल्याची स्थिती आहे. सर्वाधिक तुटवडा ‘बी’ आणि ‘ए’ पॉझिटिव्हपावसाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली असून, […]