प्रतिनिधी, मुंबई : एप्रिल व मे महिन्यातील रजा, मुंबईबाहेर गेलेले रक्तदाते, रक्तसंकलनामधील नियोजनाचा अभाव आणि निवडणुकांमुळे रद्द झालेली संकलन शिबिरे यांचा विपरित परिणाम मुंबईत दिसू लागला आहे. मुंबईतील अनेक रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.गरजू रुग्णांसाठीच्या रक्तासाठी कुटुंबीय तसेच नातेवाईक ठिकठिकाणी विचारणा करीत आहेत. निगेटिव्ह गटाचे रक्त मिळवताना रुग्णांच्या कुटुंबीयांची अधिक दमछाक होत […]