प्रतिनिधी, पुणे : पॅथॉलॉजी लॅबमध्ये वापरण्यात आलेली सिरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्यांची तीन पोती कात्रजच्या घाटात फेकल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. जैववैद्यकीय कचरा धोकादायक असल्याने सार्वजनिक ठिकाणी फेकण्यास मनाई असूनही हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला जैववैद्यकीय कचरा प्राणिमित्र बाळासाहेब ढमाले यांना शुक्रवारी […]