ठाणे: मुंबईसह उपनगरात सोमवारी मुसळधार पावसाने अक्षरश: नागरिकांचा गोंधळ उडाला. लोकलसेवा ठप्प पडली, जनजीवन विस्कळीत झालं. त्यातच सोमवारी भाईंदर परिसरात एक भयानक घटना घडली. येथे भाईंदर रेल्वे स्थानकात पिता-पुत्राने एकत्र आत्महत्या केल्याने खळबळ माजली. या दोघांनी धावत्या ट्रेनसमोर येत आत्महत्या केली. त्यांना ट्रेनसमोर आलेलं पाहून चालकाने ब्रेक लावायचा प्रयत्न केला पण त्यापूर्वीच ते लोकलखाली आले […]