प्रतिनिधी, पुणे : परमिट रूमचा परवाना नसताना वाइन किंवा बिअर शॉपमध्ये ‘बसण्याची सोय’ करणाऱ्या; तसेच या दुकानांबाहेर ‘बैठक’ बसू देणाऱ्या दुकानचालकांच्या परवान्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अभय मिळत आहे. पोलिसांचे दुर्लक्ष वाइन किंवा बिअर शॉपमधून मद्य विकत घेतल्यानंतर ग्राहक ते जवळ थांबून पित असल्यास वाइन आणि बिअर मालकांवर कारवाई करता येत नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. […]