Posted inपुणे

बारामतीतील १५७ मतदान केंद्रावर गैरप्रकार? सुप्रिया सुळेंची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघासाठी आज, मंगळवारी होणाऱ्या मतदानावेळी मतदारसंघातील १५७ पेक्षा अधिक मतदान केंद्रावर काही गैरप्रकार होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. आम्ही पोलीस बंदोबस्त चोख […]