प्रतिनिधी, पुणे : ‘पाचव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहिर या गणितज्ञाने आपल्या ‘बृहद्संहिता’ या प्राचीन ग्रंथात पर्जन्यमानाचे अंदाज खगोलशास्त्राच्या आधाराने अचूकपणे लावता येतील इतकी इत्थंभूत माहिती लिहून ठेवली आहे. होळी आणि अक्षय्य तृतीयेच्या सणांचे महत्त्व लक्षात घेऊन खगोलशास्त्राच्या आधारानेदेखील नैऋत्य मौसमी पावसाचे अंदाज अचूकपणे लावता येऊ शकतात,’ असा विश्वास ‘हायटेक बायोसायन्सेस’चे अध्यक्ष आणि ‘पर्जन्यमानाच्या अंदाजाच्या प्राचीन […]