मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून वर्तवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात केवळ ९ जागा मिळाल्या. भाजपच्या मदतीनं […]