मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. […]