पुणे: कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेत ‘पोर्श’ कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आरोपी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अशपाक मकानदारला न्यायालयाने शुक्रवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी हा आदेश दिला. त्यामुळे अगरवाल दाम्पत्य आणि मकानदारचा मुक्काम आता येरवडा कारागृहात असणार आहे.महानगरपालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून अधिकाऱ्यांमध्ये वाद, दोन खुर्च्या […]