प्रतिनिधी, नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पुढील महिन्यात (१२ जुलै) होणाऱ्या निवडणुकीत भाजपने चार ते पाच जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. यात लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले रावसाहेब दानवे आणि डॉ. भारती पवार यांच्या व्यतिरिक्त पक्षनेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्याही नावांचा समावेश आहे. यातील दानवे, मुंडे व डॉ. पवार […]