पुणे : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचे उद्दिष्ट ठेवून या सर्वेक्षणाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या सर्वेक्षणात पालिकेची कामगिरी अधिक सुधारावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करा. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या, अशा सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी गुरुवारी दिल्या. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत […]