स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीच्या मिरज मतदारसंघात रस्त्याअभावी एका शेतकऱ्याला मृत्यूनंतरही मरण यातना भोगाव्या लागल्या आहेत. विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तब्बल दीड किलोमीटर रस्त्याअभावी झोळीतून घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्याच्या नातेवाईकांवर आली. तर काही अंतर ट्रॅक्टरमधून देखील पार करावे लागले. मग एका रुग्णवाहिकेने नंतर त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यात आला.मिरज […]