मुंबई : महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबईतील शाखांना भेटी देत आहेत. शिवसेना आणि मुस्लीम धर्मीय यांच्यात घडून येत असलेल्या या एकोप्याने आगामी लोकसभा निवडणुकीत बेरजेचे राजकारण होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. समाजवादी पक्ष राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’मध्ये तर राज्यस्तरावर महाविकास आघाडीत सहभागी आहे. सपाच्या आघाडीतील समावेशाने […]