Posted inमुंबई

भुजबळांची ‘समता’ खेळी, नेमकी कोणावर कुरघोडी? मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार?

मुंबई: ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. त्यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवायची होती. पण महायुतीत त्यांना संधी मिळाली नाही. प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ते उत्सुक होते. पण १० दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पक्षानं संधी दिली. […]