पुणे : शहरात गेल्या चार महिन्यांत थोडथोडके नव्हे, तर १७ हजार मोबाइल हरवल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ प्रणालीवरील आकडेवारीवरून समोर आली आहे. या आकडेवारीवरून पुणेकर वेंधळे आहेत की काय, अशी शंका निर्माण होते. प्रत्यक्षात मात्र हा पुणेकरांचा दोष नसून, मोबाइल चोरीला गेल्यावर गुन्हा दाखल करून न घेण्याची पोलिसांची टाळाटाळ वृत्ती कारणीभूत आहे. […]