म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : व्यापक सार्वजनिक हितासाठी आदेश आहे, असे वरवरचे दाखवत कथितरीत्या कर्जपरतफेड थकवणाऱ्यांविरोधात ‘लूक आउट’ परिपत्रक प्रसृत होण्याकरिता सरकारी बँकांना कार्यालयीन ज्ञापनाद्वारे दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला आहे. ‘या माध्यमातून सरकारी बँका या न्यायाधीश व आदेश अंमलबजावणी करणारेही होत आहेत. नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य व विदेशात प्रवास करण्याच्या मूलभूत हक्कांचे […]