मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपयांचे विमाकवच देताना सरकारने आता रेशनकार्ड आणि एक लाख रुपयांपर्यंतची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा हे काटेकोर निकष कायम ठेवलेले नाहीत. रेशनकार्ड नसेल तर तहसील कार्यालयातील प्रमाणपत्राची उपलब्धता योजनेचे लाभ देताना ग्राह्य मानली जाणार आहे. या नव्या योजनेमध्ये यापूर्वी असलेल्या महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजना संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. […]