मुंबई : वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन विभागाने राज्य सरकारला केल्या आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात आता राज्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचे उद्या, सोमवारी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यात साधारणतः १५ लाख रिक्षा चालक-मालक स्वयंरोजगारित आहेत. रिक्षाच्या भाड्याचे दर, रिक्षा संचालनासंदर्भातील सर्व अटी व शर्ती राज्य […]