पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला. या युवकाने येरवडा वाहतूक पोलिसांसोबत पंधरा दिवस वाहतूक नियमनाचे काम करावे, त्याने अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा, वाहतूक जागृती फलक रंगवावेत आणि व्यसनमुक्तीसाठी डॉक्टरांचे उपचार व मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घ्यावे, अशा अटी-शर्ती न्यायालयाने घातल्या आहेत. न्यायालयाच्या […]