मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात फूट पडून पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतरही मोठ्या संघर्षातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभेत देदिप्यमान यश मिळवले. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई (भिवंडी) अशा सगळ्याच विभागातून त्यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणले. त्यामुळे पक्ष सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मनात चलबिचल असल्याची चर्चा सुरू आहे. […]