प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून बाहेर पडण्यासाठी तसेच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार करून ‘डॅमेज कंट्रोल’ केले जाणार असल्याचे समजते. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला गती येणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै २०२२ मध्ये शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा तीन वेळा विस्तार झाला […]