नाशिक : सिन्नर मतदारसंघातील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रस्तावित स्मारकावरून मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनीही महाजनांवर शरसंधान केले. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याने हलगर्जीपणाने वक्तव्य करणे शोभत नाही. महाजन हे त्यांच्याच अविर्भावात वावरत असतात. त्यांनी मानसिकता बदलावी असे सांगत, समाजभान राखून […]