प्रतिनिधी, पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अख्यत्यारीत न झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची बिले काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी या विकासकामांच्या चौकशीचा आदेश दिला. पालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी माहिती अधिकाराद्वारे या वादग्रस्त विकासकामांची माहिती मिळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात येत आहे. […]