रोहन टिल्लू, मुंबई : एकीकडे मुंबई विद्यापीठ १६८वा स्थापना दिन साजरा करत असताना दुसरीकडे विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे, बुधवारी रात्री विद्यापीठाच्या कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहातील कँटीनमध्ये दिलेल्या नूडल्समध्ये झुरळ सापडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर विद्यार्थ्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे धाव घेत तक्रार […]