प्रतिनिधी, मुंबई : महापालिकेने उद्या, बुधवारी अंधेरी पूर्व आणि पश्चिम, विलेपार्ले, जोगेश्वरी या मोठ्या परिसरासाठी मुख्य जलवाहिन्या जोडणी व जुनी नादुरुस्त जलवाहिनी काढून टाकण्याच्या कामासाठी काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामामुळे या परिसरातील पाणीवितरण व्यवस्थेत सुधारणा होईल, असा दावा करण्यात आला आहे. या भागांसाठी वेरावली जलाशयातून पाणी सोडले जात असून पाणी […]