प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरू शकणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा शासन निर्णय महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या मर्यादेत असावे, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच ज्या महिला केंद्र अथवा राज्य सरकारच्या अन्य आर्थिक […]