Posted inमुंबई

Prithviraj Chavan: दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अकरावा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

मुंबई : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात अकराव्या स्थानी असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) दिलेल्या माहितीच्या आधारे केला. या आकडेवारीवरून चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरताना महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सुधारणा करण्याची मागणी केली.विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा संपल्यानंतर चव्हाण यांनी राज्याच्या दरडोई उत्पन्नाचा मुद्दा मांडला. विधिमंडळात […]