Posted inमुंबई

सरकाराच्या जमा खर्चाचा मेळ बसेना, राजकोषीय तूट विक्रमी एक लाख कोटीपेक्षा अधिक

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा करण्याच्या नादात राज्य सरकारचे जमा खर्चाचे गणित पार कोलमडून गेले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेब्रुवारी महिन्यात राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना महसुली जमेपेक्षा खर्च वाढून तब्बल ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तूट अपेक्षित असल्याचे म्हटले होते. […]