मुंबई: लोकसभा निवडणुकीत घसरगुंडी उडाल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेला जागावाटप रखडल्याचा फटका महायुतीला बसला. ती चूक विधानसभेला टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. जागावाटप लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महायुतीत हालचाली सुरु आहेत. भाजप १५५ ते १६० जागा लढवण्याच्या विचारात आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत १५५ च्या खाली येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ८० […]