म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या वाढत्या वीजमागणीत कोळशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर वीजपुरवठा मिळविण्यासाठी राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यासंबंधीच्या सौरवीज निविदेस महानिर्मिती कंपनीला चौथी मुदतवाढ द्यावी लागली आहे. महानिर्मिती कंपनीची स्थापित ऊर्जाक्षमता १३ हजार मेगावॉट असून, त्यापैकी ९ हजार मेगावॉट औष्णिक म्हणजेच कोळशावर आधारित आहे.जवळपास २ हजार मेगावॉट जलविद्युत […]