मुंबई : मुंबईत मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न आला. काम होत नसल्याच्या रागातून या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.व्यक्ती मंत्रालयाच्या इमारतीबाहेरील सज्जावर बसला होता. पाचव्या मजल्यावरुन तो उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करत होता. […]