मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं आता राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभेचं जागावाटप लवकर मार्गी लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ बरेच दिवस चाललं. त्याचा फटका महायुतीला निवडणुकीत बसला. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीसांची मी पुन्हा येईन […]