Posted inपुणे

फ्लेक्सवर फ्लेक्स! भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर; पोलिसांची तारांबळ उडवणारा तो कोण?

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेसकोर्स परिसरात मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले. पण याच बॅनरवर एका तरुणानं थेट त्याचे बॅनर लावले. त्यातून त्यानं रोजगार, नोकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. हा प्रकार समजताच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या तरुणानं बॅनरवर त्याचं नाव आणि मोबाईल नंबरही छापला आहे. […]